माझे घर शुभंकर
(ओवीच्या चालीत ... जात्यावर बसून म्हणणार ? ..
किंवा तुळशीच्या वृन्दावनाजवळ दिवा लावतांना ?
जसे की... 'आली दिवाळी दिवाळी ' .... )
माझे घर शुभंकर शुद्ध संस्कृतीचा श्वास
कला गीत संगीताचा जेथ नित्य सहवास ॥ माझे घर...
सानथोर आनंदात येई कौतुकें पाहुणा
किलबिलाट पाखरांचा वाटे सुखाचा धिंगाणा ॥ माझे घर...
कोपऱ्यात देव्हाऱ्यात बसुनि पाही 'तो' निवांत
जसे हवे त्याला घर हे असो समाधानी शांत ॥ माझे घर...
प्रसन्नतेत भारुन भरल्या दिशा दाही मांगल्यात
वास्तु तथास्तुही म्हणते काही उणे ना सौख्यात ॥ माझे घर...
पद्मनाभ हिंगे, पुणे...
२३ मार्च २०१७

👌सुंदर कविता, भावही सुंदर !
ReplyDelete