मैं शायर तो नहीं
उर्दू भाषा शिकण्याची तशी खूप दिवसांची माझी इच्छा होती. आजही आहे. किती गोड भाषा. खरंच. पण जमतच नाही, याचं फार वाईट वाटतं. हिंदी चित्रपटातली काही उर्दू मिश्रीत गाणी ऐकली की त्यातली शेरोशायरी, शब्दरचना ऐकताना, वाचताना खूप छान वाटतं. ह्या शायर लोकांच्या डोक्यात उसाचे मळेच आहेत, की कल्पनांचे मधुर शब्दकण गोळा करून, आम्हाला कधीच न भेटलेल्या, काही वेगळ्याच जातीच्या मधमाशांनी यांच्या डोक्यातच पोळी बांधली असावी आणि त्यातूनच हे अवीट गोडीचं माधुर्य स्रवत असावं का असं वाटावं इतकी सुंदर रचना ते करत. आजही काही असे गीतकार आहेत.
मी एक उदाहरण देतो. साहिर लुधियानवी यांचं एक गीत मला कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.....
पांव छू लेने दे फुलोंको इनायत होगी l
वरना हमको नहीं, इनको भी शिकायत होगी l
आप जो फूल बिछाये, उन्हे हम ठुकराये l
हमको डर है के ये तौहिन-ए-मुहोब्बत होगी l
"वाह क्या बात है।" इतके सहज शब्द ओठांवर आपोआप येतात. "साला हमको क्यूँ नहीँ लिखने आती ऐसी खूबसूरत शायरी।" ऐसे ओबडधोबड शब्दही मनात येतात.
अर्थात या गीताला तितकीच सुरेल चाल लावणारा संगीतकार आणि गाणाऱ्या त्या स्वर्गीय आवाज लाभलेल्या गायक जोडीचाही सहभाग आहेच म्हणा.
हे झालं एक उदाहरण. अजून किती तरी उदाहरणे देता येतील. असंच एक मधुर गीत मला अफाट आवडतं.
त्याबद्दल सांगतो. आवडेल ना की कंटाळाल ?
प्रेम आणि स्त्री सौंदर्य, प्रेमातली व्याकुळता, विरह यावर या शायर मंडळींची प्रतिभा तर अशी काही बहरते की या सुंदर मनोहारी शब्दसागरलहरीत सतत विहार करावा.
सौंदर्य हे मोठं सुंदर, लक्ष विलक्षण विचलीत करणारं. प्रेमात गुंतवणारं. मोहात पाडणारं. पुनःपुन्हा पहात रहावंसं वाटणारं आणि मुग्ध होऊन स्वतःलाही हरवून टाकणारं. हवंहवंसं अगदी सदैव हवंहवंसं वाटणारं....
एखादी सुंदर स्त्री, अचानक समोर येते. स्वप्नांत नाही .. साक्षात प्रत्यक्षात....
योगायोगानं तिच्या सुंदर मुखाचं दर्शन होतं. अनुपम रेखीव सौंदर्य. मोहक हालचाल. अप्रतिम पण सात्विक लावण्य. परमेश्वराने हातचं काहीही राखून न ठेवता मोठ्या एकाग्रतेने स्वतःच्या हातानंच जणू एखादं शिल्प साकारावं.
अशा सुंदरीने कथानायकाच्या नजरेला नजर देताना तिचं लाजून जाणं
आणि ........
(आणि मी स्वत:ला नायकाच्या रुपात कल्पिले तर खल्लासच ....
जीभ कोरडी, घसा कोरडा. मग तोंडातून शब्द तो काय फुटणार ?
असंच झालं असावं त्याचं, म्हणजे कथानायकाचं .. पण त्या शायराचं - शकील बदायुनीचं काय सांगावं ! नायकाची ही व्याकुळता त्यांनी अतीव सुंदर शब्दांत मांडली आहे.
त्याच्या हृदयातल्या सगळ्या भावभावनांना मुक्तपणे वाट करून देणारे अनोखे शब्द अत्यंत सुरेल होऊन शकीलजींच्या लेखणीतून बाहेर उतरु लागले ..
ती सुंदर की ते शब्द, त्या कल्पना-भावना सुंदर ! अश्या शंकेला सुद्धा जागा न देता, ती आणि तिच्या सौंदर्याचे वर्णन करणारी शायरी एकमेकासोबत जणू स्वर्गीय सूर घेऊनच वाटचाल करू लागली आणि कागदावर उतरली......
आणि एका अप्रतिम गीताचा जन्म झाला ..
हुश्श बाप रे .. याबद्दल बोलताना मला दम लागला खरा .. पण या मेरे मेहबूब मधल्या गीताने मला दिलेला आनंद तुम्हाला सांगताना माझा आनंद मला मात्र सांगता येत नाही. या गीताच्या चार ओळी तुम्हाला वाचायला देतो. तुम्हालाही शकील बदायुनी नामक प्रतिभावान शायराच्या कल्पनेच्या भरारीची कल्पना येऊ शकेल.
कथा नायकाने ते आरस्पानी सौंदर्य एकदाच पाहिलं आणि त्या सौंदर्याच्या प्रेमात तो पडला. ती भेटावी आणि हां विरह संपावा ही भावना, ती व्याकुळता शकीलजी यांनी किती नज़ाक़तींने मांडली आहे, वाचा तर खरे... मी एखादेच कड़वे देतो.
आणि हो, कधीतरी उरलेली सहा कड़वी शोधून वाचा आणि हे गाणेही अगदी जरूर ऐका.
मेरे मेहबूब तुझे मेरी मोहोब्बत की कसम
फिर मुझे नर्गिसी आँखोंका सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे ||
ए मेरे ख्वाब की ताबीर मेरी जान-ए-ग़ज़ल
जिंदगी मेरी तुझे याद किये जाती है
रात दिन मुझको सताता है तसव्वुर तेरा
दिलकी धड़कन तुझे आवाज दिये जाती है
आ मुझे अपनी सदाओंका सहारा दे दे....
.. मला स्वतःशी हसताना हिनं पाहिलं. लग्गेच ही प्रश्नाळलीच,
" ऑऑ.. काय खुदखुदताय ? कोणाची येतीय येवढी आठवण ?"
" अगं..बघ ना," 'त्या'काळात मी लिहिलेलं काव्य वाचतोय. त्या शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, शैलेन्द्र, ग.दि.माडगुळकर, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली सुंदर गीतं ऐकली की मलाही वाटायचं, आपणही असं सुंदर काही लिहावं. निदान प्रयत्न तरी करावा. माझ्या हृदयातला कवी बघ ना काय फुर्फुरत होता.
ऐक ना .."
तोः हे गीत भावनांचे तुझियासवे मी गावे l
तू माझिया सखे गं साथीत आळवावे llधृll
तोः फुलवीत लाख स्वप्ने मन मोहरून गेले l
मधु रम्य कल्पनेच्या गगनामधे उडाले l
मधु शब्द शब्द जुळुनी
हे प्रीत गीत व्हावे ll१ll
तो: हातात हात देई प्रणयांत धुंद होऊ l
बाहूत येई माझ्या सौख्यात आज न्हाऊ l
या प्रणय रम्य वेळी
बाहूत तू असावे ll२ll
तीः आले तुझ्याचसाठी हातात हात घे रे l
राजा प्रियेस वेड्या तू सावरून घे रे l
वेलीस या तुझ्या रे,
आधार तूचि व्हावे ll३ll
हसताय ना .. हसा...
ट ला ट जोडण्याचा काय आणि किती तो आटापिटा !! बाप रे ... किती टुक्कार लिहायचो मी .. श्शी ..
मला माझ्यावरच हसू येतंय.." मी काही शायर नाही. सुंदर काव्य करणं हे आपलं काम नाही याची पक्की जाणीव होत राहते....
कधी नव्हे ते बाईसाहेबांनी माझ्या कडे कौतुकाने पाहिले !! म्हणाली. .
"अहो त्यात काय? बरं लिहिलं होतं की ..आणि आत्ताच्या गाण्यांपेक्षा नक्कीच बरं आहे हो".
'बरं' या तिच्या शब्दामुळे मन खट्टू झालं हो माझं (..निदान तिनं तरी चांगलं म्हणायला हवं होतं !)..
माझ्या काव्याचं सोडा.. पण, खरंच त्या काळात किती सुंदर शब्दांत गीतकार भावना व्यक्त करायचे.
ठीक आम्हाला नाही जमत सुंदर शायरी करायला, पण वाचायला तर जमेल, ऐकायला तर जमेल.
लग्न झालं, मुलं झाली, ती मोठी झाली की त्या काळातल्या गोड आठवणी किती आनंद देतात, हे जून झालेल्या दांपत्यालाच कळतं बरं ..
पद्मनाभ हिंगे,
पुणे.
११ एप्रिल २०१७.

नमस्कार बहुत अच्छे. लिहीत रहा. As long as we are enjoying don't stop at any stage. मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
ReplyDeleteWriting gives immense satisfaction to writer himself. So forget readers & Keep writing 😊👍
ReplyDelete