मेरे फोटोको.........
फोटो काढणे हे आजकाल सर्वसामान्य माणसाला फारच सोपे झाले आहे. उचलला मोबाइल, क्लीचिक... काढला फोटो. वयात आल्यावर जसे सारखे आरशात बघावेसे वाटते ना अगदी तसेच हे फोटो काढण्याचे वेड मोबाईल बाळगणाऱ्यां प्रत्येक हौशी व्यक्तीला असतेच. ज़रा नीट आवरले, इस्त्रीचे किंवा नवे नवे कपडे घातले की लगेच फोटोसेशन सुरू ! मित्राबरोबर किंवा मैत्रीणीबरोबर, प्रेयसी-प्रियकराबरोबर, कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर फोटोसेशनचा,प्रयोग, उद्योग करताना हरएक मोबाइल धारक दिसू लागलाय. मोबाइलवर जोडीदारासोबत स्वत:चा फोटोसुद्धा असावा यासाठी याआधी इतर कोणा मित्राकडे नाहीतर अगदी जवळून कोणी, अगदी सोम्या गोम्या जरी जात असेल तर,"ज़रा प्लीज् एक फोटो काढणार का ?" असे विचारत त्याचे होती मोबाइल सोपवून फोटो काढला जातो. आतातर त्यात सेल्फी हां प्रकार या फोटो काढण्याच्या उठाठेवीत जास्तच वाढलाय, इतका की, सेल्फी काढण्याच्या नादात काहींनी तर आपले प्राण गमावले आहेत. पण यातून कोणी काही धड़ा घेतील तर शपथ. काही शहरात सेल्फी पॉइंट्स उपलब्ध करून दिले जाताहेत. बरं हे तरुण वर्गातच फँड आहे का? तर तसेही नाही. ह्याला कोणतीच वयोमर्यादा नाही. अगदी अजूनही चड्डीत शू करणाऱ्या बाळापासून वयस्कर महा ताऱ्यापर्यंत (म्हातारा - महातारा - superstar ) फोटो काढण्याचे हे व्यसन लागलेले दिसते. अस्मादिकसुद्धा या वेडातून सुटलेले नाहीत बरं का ! हा सुरवातीचा फोटोच बघा ना. 'आम्ही बिबलाबिब्ली निघालो बरं का पहिल्यांदाच विमानात बसून फॉरीनला' अशी तळटीप टाकून लग्गेच Whats App वर हां सेल्फी आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्सला, फ्रेन्ड्सना पाठीवला बी ! चक्क इमानात बसून. अगदी फ्लाइट मोड वर जायच्या आधी ! काय ते कवतिक!! काय तो उत्साह !!
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, नदीच्या काठापासून समुद्रकाठापर्यंत, झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत, पाखरांपासून घोड़ी गाढवाँपर्यँत, जे जे म्हणून चांगले वाटेल ते निसर्गचित्र, झटाक्कन मोबाइलात बंदिस्त करायचं. अर्थात आमचं निसर्ग सौंदर्य पाहण्याचं वेड मोबाईलपुरतंच मर्यादीत असतं बरं का. सहली, सणा समारंभाचे फोटो तर इतके की अगणितच, म्हणजे त्यांची गणतीच नाही.
आता मोबाइलमध्ये सातत्याने नवनव्या सुविधा येतच असतात. एडिटिंग, फ्रेम्स अमुक ढमुक. त्यामुळे होतं काय की फोटोला आणखी सजवता येतं. त्याला विनोदी रूपही देता येतं. बाईला मिशा काढणे, पुरुषाचे ओठ रंगवणे, चेहरे हृदबदामाच्या आकाराच्या फुग्यात टाकणे, ब्राइट करणे, क्रॉप करणे आणि असेच अनेक प्रकार फावल्या वेळात करता येतात, केले जातात.
काही वर्षांपूर्वी फोटो काढायचे म्हणजे फोटोस्टुडिओ शोधावा लागायचा, मग त्या स्टुडिओत जायचं, तिथल्या आरशात आपली छबी न्याहाळून पावडर कंगवा घेऊन चेहरा सजवायचा, वाकडे तिकडे होत पोझेस घेऊन बघायच्या आणि या तयारीनिशी फोटोग्राफरसमोर जायचं. शेवटी तो सांगेल तसेच पोज देत उठाबसायचे. फोटो काढल्यावर आधी किंवा फोटो काढायच्या आधी पैसे चुकते करायचे. "या चार दिवसांनी" तो सांगायचा. नाईलाज. चार दिवसांनी फोटो मिळेलच याची खात्री नसायची. परत जावे लागायचे. पावती जपून ठेवावी लागायची. कारण स्टुडिओत तशी पाटी लिहिलेली असायची, 'पावतीशिवाय फोटो मिळणार नाही'. फोटो मिळायचा. आधी तो पहायची उत्सुकता. उत्सुकतेने फोटो पाहिला की... मनातल्या मनातच पुटपुटायचे, "शी चांगला नाही आला फोटो" !! फ़ोटोग्राफरकडे बघून खोटं खोटं हसत तेथून काढता पाय घ्यायचा. हां अनुभव तुम्हाला आला किंवा नाही हे मला नाही माहीत. लग्नसमारंभाच्या फ़ोटोंचा अल्बम पाहायचा एक सोहळा असायचा. खूप मौज असायची.
आता.... खटाखट फोटो काढता येतात अगड़ी शेंबड्या पोरालासुद्धा ! काढला फोटो, टाक Whats App वर. करायचा शेयर फेसबुकवर. आणि वाट पाहायची, कोण लाइक करतंय, कोण कमेंट करतंय. कोणाचाही मोबाइल घ्या. ९०/९५ % मोबाइलच्या ग्यालऱ्या फुल्ल झालेल्या असतात. अगदी मेमरी कार्डसुद्धा फुल्ल. आता एवढ्या तस्वीरी काढून काय करायच्या असतात हां प्रश्न आहेच. कधी हुक्की आली की मी मोबाइल सरसावून बायकोचा फोटो काढू लागतो. तिच्या लक्षात आलं की ती खेकसतेच. "सारखे काय फोटो काढायचे ? आणि करायचे काय एवढे फोटो काढून? भिंतीवर काय फ़ोटोफ्रेमची माळ लावायची आहे?" पण मीही खोडसाळ. काढतोच फोटो. नशीब... चिडून ती मोबाइल हिसकावून घेऊन आपटून फोडून टाकत नाही.
पण मी एवढी वायफळ वाटणारी बडबड तुमच्यासमोर का करतोय असा तुम्हाला प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसं तर फोटो या विषयावर खूप लिहिता येईल, आणि मला खात्री आहे, हे लेखन तुम्ही फाडून टाकणार नाही. पण तूर्तास थोड़ा श्वास घेतो. उगाच प्रस्तावनेचं हे भलं मोठं पाल्हाळ लावून तुम्हाला कंटाळा आणावा असं नाही वाटत. पण काही तरी सांगायचंय ना तुम्हाला...
तर सांगायचं काय की आता तुम्हाला टप्प्या टप्प्यानं माझ्या मोबाइलवरचे एक दोन एक दोन फोटो पहावे लागणार आहेत. आणि त्यावरची माझी पोपटपंची वाचावी लागणार आहे.
वाचाल ना ? Please....
पद्मनाभ हिंगे, पुणे.
२९ एप्रिल २०१७.

No comments:
Post a Comment