आकडेमोड
MH 12 9873 --९+८+७+३=२७--२+७=९--अहाहा मस्त !!!
२८-०३-१९५३ -- २+८+०+३+१+९+५+३=३१-३+१=४ हात्तिच्या !!!
नको, असं नको, फक्त २८ घेऊ -- २+८=१ -- झक्कास !
Mobile No. 9011012120-- ९+०+१+१+०+१+२+१+२+०=१७--१+७=८, अरारारा-खतरा !!! नको
9923193009 -- ९+९+२+३+१+९+३+०+०+९=४५-- ४+५=९, चालेल की, लय भारी !!!!!
माय डिअर फिरेंडस ..नमश्कार,
कहिये क्या सुनेंगे आप ?
आप पूछेंगे ये क्या हो रहा है ??
ही कसली आकडेमोड ? हे आकडे आणि ही आकडेमोड कशाला खेळताय ?
चलो, आज तुम्हे एक अलग बात सुनाना चाहता हूँ l जो बात सुनाने जा रहेला हूँ, उस्कु समझाणेकेलिये इक तुम्हारे आवडनेवाले एक दो गाणेके बारेमे भी बताता हूँ l (जरा माफ़ करनेका दोस्तो, अपना हिंदी कच्चा है, क्या l )
हाँ इसमें तो ये एक वो गाना है ..
अपनी ग्यारंटी है ईस्के उप्पर आप बहोत बार नाचें होंगेच.
लेकिन पहले आपको एक गोष्ट ऐकनी पडेंगी क्या ?
(मैं पहिलेच आपकु बोला था ना की मेरा हिंदी जरा .. क्या बोलते उस्को .. मैं बहोत घाणेरडा बोलता हूँ को क्या बोलते है ?....देखा, इतनी खूबसूरत भाषा है हिंदी, और मुझे ठिकसे बोलणेकुच नहीं आती !!...जाऊन देत मी आयच्या भाषेत बोलतो.)
हां तर, मी काय सांगणार होतो ?
आठवलं...
(आठवले नाही.. आज मला कुठलीही कविता आठवले ली नाही !)
आज काय तारीख बरं ?
२४.०४.२०१७, म्हणजे २+४+४+२+०+१+७=२०. म्हणजे आजचा शुभांक २ ...
तुम्ही विचाराल हे काय ? गाण्याचे काही सांगणार होता ना ?
थांबा हो, गडबड नका करू. सांगतो, म्हटलं ना.. जरा धीर धरा.
माझ्या एका मित्राची, गब्बूची ही रोजची आकडेमोड आणि नंतर त्यावरची बडबड.
परवा एका मित्रानं, त्याचं नाव शाणा, मस्तपैकी एक चारचाकी गाडी घेतली.
गब्बूने नेहमीप्रमाणे गाडीच्या नंबरप्लेटवरील आकड्यांची बेरीज केली. जरा गंभीर होऊन गब्बू शाणाला म्हणाला, अरे टोटल ४ होतीये. अशुभ आहे. तुझ्या पहिल्या गाडीच्या नंबरची टोटलही ८ होती. ८ अशुभ आकडा आहे हे तुला सांगूनही तू ऐकलं नाहीस ! तुझा शुभांक १ आहे, हेही मी तुला सांगितलेले विसरलास ?
शाणा गालात हसला. त्याला गब्बू असं विचारणार याची कल्पना होतीच.
शाणा हुशार. म्हणाला, अरे हो, मी पहिल्या गाडीच्या ८ टोटल मध्ये माझ्या मुलाचा २ हा भाग्यांक मिळवला. आणि टोटल झाली १. आणि यावेळी ४ मध्ये मुलीचा ६ हा भाग्यांक मिळवला. झालं की नाही तू म्हणतो त्याप्रमाणे १ ही शुभ टोटल !!
गब्बू गालात गुब्बारे धरून गपगार झाला.
बघितलं.
आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शाणाने दोन गाड्या घेतल्या. पण गब्बूच्या श्रद्धेला न दुखवता त्याची अंधश्रद्धा दूर ठेवणारा शाणा आहे का नाही खराखुरा शहाणा ?
अहो मला सांगा, असे शुभद आकडे कसं काय आपलं कल्याण करणार? आणि ते अशुभ आकडे का म्हणून आपलं वाईट करतील ?
असं असतं तर भरत व्यासांनी, खूप प्रसिद्ध झालेलं हे गाणं "एक दो तीन चार, भैया बनो होशियार .. सबका है कहना अनपढ ना रहना, जाओ गुरुजीके द्वार .." असा चार हा अशुभ म्हणवला गेलेला आकडा टाकून निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपानदेव या तिघांना उद्देशून मुक्ताबाईच्या तोंडून ऐकवण्यासाठी लिहिलं असतं ?
आता मी म्हटल्याप्रमाणे ज्या गाण्याविषयी मी बोललो होतो
त्या गाण्याचे बघा.
धक धक गर्ल, ओळखता ना तिला ? नक्की ओळखत असाल.
तर ही धक धक गर्ल १३ या पाश्चात्य लोकांना अगदी अशुभ वाटणारा आकडा कसा झक्कास तालासुरात नाचत ठुमकत ऐकवते आणि आपणही त्या गाण्यात ठेक्यात कसे धुंद होऊन जातो ते जरा आठवा.
ते गाणं आठवतंय ना ?
धक धक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित, माहीत असेलच तुम्हाला.
तर, माधुरी, मोहिनी बनून या गाण्यावर नाच करते आहे.
" एक दो तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारह बारा तेरा..." असं म्हणत, तेरा या तथाकथित अशुभ आकड्यावर थांबते.
आणि...
आणि तोच तेरा हा आकडा घेत अतिशय आशावादी, सकारात्मक विचार करीत, आनंदात मनातली भावना व्यक्त करते .. तिच्या दूर असलेल्या प्रियकराला आपला आशावाद ऐकवते ..
काय तर...
"तेरा करूँ...तेरा करू दिन गिन गिनके इंतजार ..
आजा पिया आयी बहार .."
मला तुम्हांला काय सुचवायचं आहे हे नक्कीच कळले असेल. तेवढे वाचक हुशार असतातच.
काही नसतं हो असं काही अशुभ या आकड्यांत.
श्श्शू...
कोणाला सांगू नका हं, मलाही ही सवय होती. मी सुद्धा माझ्या जन्मतारखेची, मोबाईल नंबरची अशीच बेरीज करून काय करायचे ते ठरवायचो. वरची आकडेमोड पाहिली ना ? जाता जाता रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट वरील आकड्यांची झटकन बेरीज करायची. आकडा शुभ असेल तर खुशीत, अशुभ असेल तर उगाचच नाराजी ! आता ही सवय कमी झाली आहे.
सकाळी घराबाहेर पडल्यावर दिसलेली पहिली गाडी महत्वाची. नंबर प्लेटवरच्या आकड्यांची बेरीज १-७-९ असेल तर दिवस मस्त जाणार हा भाबडा आशावाद.
सतरा म्हणजे खतरा, हे डोक्यात ठाण मांडून बसलेले वेड. काय म्हणावं याला ?
एक दिवस सहजच वडलांची आठवण आली. सकाळी ऑफिसला जायच्या आधी, कितीही घाई गडबड झाली तरी व्यवस्थित देवपूजा करणार आणि सतराशे साठ आरत्या अगदी तालासुरात म्हणणार !
कशी काय कुणास ठाऊक, एकदा ते म्हणत असलेल्या मारूतीच्या आरतीमधले शब्द आठवले.
" सतराणे उड्डाणे हुंकार वदनीं।
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी।
कडाडिले ब्रह्मांड धाकें त्रिभुवनी।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥"
'सत्रा' या शब्दाने सुरुवात झालेली ही आरती मला मारुती रायाची आठवण करून देती झाली. सतराणे या शब्दाचा आरतीमधला अर्थ वेगळा का असेना, पण माझ्या मनातली सतरा या आकड्यांविषयी - शब्दाविषयी वाटणारी नाहक भीती शंका घालवणारी ही मारूतींची आरती मला नव्याने खूपच उपकारक ठरली.
मारुती म्हणजे हनुमान म्हणजे बलभीम. समर्थांनी जणू जाणीव करून दिली की मारुतीराया हा आपल्या मनात आत्मविश्वासाचे रूपात बसलाय.
मंडळी आकडेमोड करायची माझी सवय अजून तशी धुगधुगी असल्यासारखी आहे पण त्यामुळे ४, ८, १३, १७... या खतरा वाटत असलेल्या आकड्यांची भीती मात्र कमी झाली. पटापट आकडेमोड करीत गणित करायची सवय बरी असते, म्हणून ही सवय असायला हरकत नसावी.
तुम्हांला नाही ना वाटत अशी अशुभ आकड्यांची भीती.
बघा बुवा मला काय सांगायचे ते मी सांगितले. पटलं तर नक्की कळवा.
पद्मनाभ हिंगे,पुणे
२४+०४+२०१७=२०
= २+०=२
हाहाहा..चालतंय की...
तुमचा आणि माझा दिवस मस्तच जाणार..
आकडेमोड, गाणी, गाडी व इतर गोष्टी सांगता सांगता केव्हा तू मर्म स्पर्षी ज्ञान दिले ते कळलेच नाही. उशीरा का होईना पण आपण हे लिखाण पाठवतो व वाचतो. बरे वाटते. आणि अभिमान ही वाटतो.
ReplyDeleteछान लिहिले आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Delete