विनोद खन्ना
देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकारके
" छिनू ... निकल बाहर... अगर बापका बेटा है तो,
मुकाबला करना है तो सामने आ - मर्दोंकी तरह...
देखूँ तो सही कितना दम है तुझमें ...
तू बाहर आयेगा, या मैं अंदर आऊँ ?
याद रख, इस पिस्तौलमें जितनी गोलियाँ है, एक एक करके तेरे खोपडीके पार कर दूँगा....
इस बार मैं जेल नहीं, तुझे मारकर सीधा फाँसीके तख़्तेपर चढ़ जाऊंगा।
छिनू,
अब ये लड़ाई झगड़ा और अच्छा नहीं लगता।
छोड़ दे, ख़तम कर दे ये दुश्मनी। "
आजही मला आठवताहेत हे जोशीले संवाद. तो अंदाज,त्या संवादफेकीतील निर्णायक धमक आणि तरीही ते वैर, ती सततची खुनशी हाणामारी आता तरी पुरे झाली, बस झाली, आता ती मनाला नकोशी वाटणारी आहे, क्लेश देणारी आहे, हे सांगणारी समजूतदारीची आर्जव आणि हे सारे दृश्य जिवंतपणे पडद्यावर उभे करणारा तो देखणा दणकट उंचापुरा, त्या जमानातल्या तरुणांचा लाडका अभिनेता, विनोद खन्ना...
प्रतिभाशाली,संवेदनशील गीतकार लेखक दिग्दर्शक आदरणीय गुलज़ारसाहेबांच्या 'मेरे अपने' या चित्रपटातले हे खणखणीत संवाद. चित्रपटाचे कथानक, त्यातील तरुणांच्या दोन गटातला जीवघेणा संघर्ष, आणि त्या समर प्रसंगांचं केलेलं उत्तम चित्रण. मीनाकुमारी सारखी समर्थ अभिनेत्री आणि विनोद खन्ना - शत्रुघ्न सिन्हा या दोघा चित्रपट सृष्टीत नव्याने दाखल झालेल्या तगड्या अभिनेत्यांची सुंदर अभिनय जुगलबंदी, ह्या वैशिष्ट्यांमुळे तरुणाईने हां चित्रपट डोक्यावर घेतला. माझ्यासारखे त्या काळातले तरुण या चित्रपटाने आणि त्यातल्या विनोद खन्ना शत्रुघ्न सिन्हा यांच्या अभिनयाने पार भारावून गेले होते.
१९७१ मध्ये हां चित्रपट प्रदर्शित झाला. बहकलेल्या भरकटलेल्या युवापिढ़ीतला जळजळीत संघर्ष गुलजारसाहेबांनी मोठया कुशलतेने मेरे अपने मध्ये चित्रित केला होता.. विनोद खन्ना(शाम) आणि शत्रुघ्न सिन्हा(छिनू) हे दोन तगड़े अभिनेते त्यावेळी तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले होते.
विनोद खन्ना...
मी एका ठिकाणी वाचलं होतं की, त्या दुर्दैवी ऐतिहासिक फाळणीनंतर, पेशावरला जन्मलेले लहानग्या वयातले विनोदजी आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईला पोहोचले. कधी मुंबई, कधी दिल्ली, तर कधी नाशिकमध्ये शिक्षण घेत विनोदजी सिडेनहैम कॉलेजमधून कॉमर्स ग्रेजुएट झाले. बोर्डिंग स्कूलमध्ये पाहिलेल्या सोलवा साल आणि मुग़ल ई आज़म या चित्रपटांमुळे ते चित्रपटांच्या प्रेमात पडले.
१९६८ मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते, सुनील दत्त यांच्या 'मन का मींत' या चित्रपटातून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. खलनायक, सहनायक आणि नायक असा त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला. आजवर त्यांनी १४० हून अधिक चित्रपटातून भूमिका केल्या. सच्चा झूठा, मेरा गाँव मेरा देश, या चित्रपटांनी त्यांना आणखी ओळख दिली. मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर ऍंथोनी, हेराफेरी या चित्रपटांमधून त्यांची अमिताभ बच्चन यांचे बरोबर जमलेली जोड़ी प्रेक्षकांना भावली.
कॉलेज जीवनात मला चित्रपट पाहण्याचे खूप वेड होते. आणि काही चित्रपट आणि त्यातले निवडक कलाकार ह्यांनी तर कायमच मनावर राज्य केले आहे. आवडलेले चित्रपट दोन दोन, तीन तीनदा तरी पाहिले जायचेच, नव्हे पाहायलाच हवेत असा परिपाठच होता. त्या काळात विनोद खन्ना तर फ़ेवरीटच. कारण तरुण पिढ़ीला आवडणारे देखणे, बलदंड़ व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनय.
विनोदजींचा मला नेहमी आवडणारा आणि माझ्या कायम आठवणीतला एक चित्रपट म्हणजे अचानक. १९७३ मध्ये गुलजारजींनी अचानक हा चित्रपट विनोदजींना घेऊन केला. एका सत्य घटनेवर आधारीत
के. ए.अब्बास यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली होती. अचानक मध्ये मेजर रणजीत खन्ना ही भूमिका विनोदजींनी समर्थपणे साकारली होती. प्रेक्षकांना हा रणजीत खन्ना चटका लावून गेला. मला आजही हा चित्रपट आठवला की डोळ्यासमोर विनोदजींचा घायाळ मेजर डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम. पण अचानक एक दिवस घरी आल्यावर त्याला जे कळतं त्याने तो पुरता घायाळ होतो. पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा तो खून करतो. त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. चित्रपटाची कथा वेगाने सरकतांना मेजर खन्नाला जखमी अवस्थेत इस्पितळात आणले जाते. या शिक्षा सुनावलेल्या कैदयावर वाचवण्याची जबाबदारी तेथील डॉक्टरांवर येते, कशासाठी तर.... त्याला जिवंत फासावर चढवण्यासाठी !!! विनोदजींनी ही भूमिका अतिशय समरसतेने सादर केली होती.
विनोद खन्ना यांचा इन्कार हां असाच एक मला आवडलेला आणि आठवणीतला चित्रपट.
मनात घर केलेला आणि आठवला की, त्यातले प्रसंग झरझर डोळ्यांपुढे उभे राहतात असा विनोदजींचा एक चित्रपट म्हणजे, १९७४ मध्ये आलेला विनोद खन्ना तनुजा बिंदू यांचा एक सुरेख चित्रपट, इम्तिहान. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मदन सिन्हा. प्रमोद शर्मा या आदर्श आणि सभ्य अशा इतिहासाच्या प्राध्यापकाची भूमिका विनोदजीनी पडद्यावर साकारली होती. मला त्यांची चित्रपटातल्या संवादातली ती वाक्ये अजूनही आठवतात. त्यात ते विद्यार्थ्यांना सांगतात, की काही लोक वाटेवरून चालताना घसरतात आणि पडतात, काही घसरतात पण स्वत:ला पडता पडता सावरतात, मात्र माझ्यासारखे वाटेवरून चालतांना घसरतही नाहीत आणि खाली पडतही नाहीत. कारण त्याना स्वत:बद्दल आत्मविश्वास असतो.
इम्तिहान चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या प्राध्यापकाची आणि विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजचे काही विद्यार्थी अत्यंत बेशिस्त आणि गुंडगिरी करणारे असतात. त्यातला एक राकेश आणि चेअरमनची मुलगी रिटा हे दोघे प्राध्यापक शर्मा आणि प्राचार्यांची मुलगी मधु यांच्यात जुळलेल्या प्रेमावर जळफळत असतात.रिटा प्राध्यापक शर्माना फसवून एका जाळ्यात अडकवते. संकटात फसलेले परंतू दरम्यानच्या काळात विद्यार्थीप्रिय झालेले प्राध्यापक शर्मा न डगमगता आपलं निरपराधित्व सिद्ध करतात. पण सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध कॉलेज सोडून निघतात. ह्या प्रसंगावर चित्रित केलेले, मजरूह सुलतानपुरी यांच्या सुंदर शब्दातले, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सुरावटीने सजलेले आणि अर्थातच किशोर कुमार यांनी गायलेले एक सुरेख सुरेल गीत आज सतत माझ्या ओठांवर येते आहे....
रुक जाना नहीं तू कहीं हारके
काँटोंपे चलते मिलेंगे साये बहारके
ओ राही ओ राही ओ राही ओ राही
साथी ना कारवां है, ये तेरा इम्तिहान है
यूँही चलाचल दिलके सहारे
करती है मंजिल तुझको इशारे
देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकारके
' विनोद खन्ना '.... माझ्या या लाडक्या हिरोच्या दु:खद EXIT वर भावना व्यक्त करतेवेळी या चार आठवणी आज प्रकर्षाने समोर उभ्या राहिल्या, त्या जमेल त्या मोडक्या तोडक्या शब्दांत का होईना पण खरंच मांडाव्याश्या वाटल्या. .
जीवनात सतत इम्तिहान आहेच. या प्रत्येक इम्तिहानला सामोरं जाण्यासाठी संत कवी लेखक विद्वान् सारेच आपापल्या पद्धतीने सांगत शिकवत असतात. पण हीच शिकवण आपल्या अभिनयाने कायमची मनावर कोरणारा अभिनेता हाही नकळत जीवनात फार काही मनावर बिंबवून जातो.
आदरांजली श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे. त्यांच्या आत्म्याला शांति आणि सद्गति मिळावी हीच प्रार्थना.
पद्मनाभ हिंगे, पुणे
२७ एप्रिल २०१७.

वाह! तुमच्या लेखनाला...आह त्याच्या जाण्याला..
ReplyDeleteवाह! तुमच्या लेखनाला...आह त्याच्या जाण्याला..
ReplyDeleteBrilliantly written Mamashri...
ReplyDeleteक्या बात है!
ReplyDeleteGood article
ReplyDelete