हा निरागस निसर्ग कोपायची आपण वाट पाहत बसायचे का ?

वाटतोय ना पहावासा....
वाटतोय ना जवळपास हवाहवासा....
याच्या सावलीत बसावेसे वाटतेय ना....
सूरपारंब्या खेळायची हौस....
भागवावीशी वाटतेय ना....
(परवा गावी गेलो होतो,तेंव्हा काढला हा फोटो)
ह्याला बघताच, कुणी धावले... ह्याच्या पारंब्या पकडून झोका घेऊ लागले... कुणी झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागले... तर प्रौढांनी याच्या पारावर ठाण मांडून, 'चला आमचा फोटो काढ़ा' म्हणून ऑर्डर सोडली.
किती सुंदर बहरलाय ना हा डेरेदार वड..
काढू या का थोडीशी सवड...घेऊ या का खांद्यावर पाण्याची कावड.... लावूया का प्रत्येकाने एक एक रोपटे..
वाढलेल्या उन्हाच्या झळा... सांगताहेत; संपत आलाय उन्हाळा... आलाय की दाराशी पावसाळा...
अगदी परवा परवाच तर आभाळातल्या ढगांनी आरडून ओरडून सांगितलं की... आणि भरीसभर म्हणून विजांनीसुद्धा थयथय नाचत कडकडाट करीत डोक्यात लक्ख प्रकाश पाडलाच की... आठवतंय ना... मग आता उगाच वेळ कशाला घालवायचा ??
थेंबाथेंबातून पावसाच्या... उत्साहाचे सजीव कोंब फुटतील... घामाच्या अन पावसाच्या थेंबाथेंबांची... छोटीमोठी तळी साठतील....तहानलेली झाड़े वेली, पक्षी प्राणी पाणी पिउन तृप्त होतील.
तळ्या तळ्याच्या काठाने... लावू या चिंच आंबा पिंपळ वड... खुलवूया फुलवूया गारव्यात या...जीवन जगण्याची खरी आवड......
चिमणी पाखरांची गर्दी होईल....
खरं सांगू का.... ही काही एकट्यानेच घ्यायची जबाबदारी नाही...
कमी झालेल्या प्राणवायुने प्राण तर अगदी कंठाशी येऊ घातलेत....असे इथे या डेरेदार वृक्षाखाली याल तेंव्हा शुद्ध हवेचा घमघमाट वाढलेला आहे हे कळेल....सावलीसावलीत प्रसन्नता वाढल्याची जाणीव होईल.... पोराबाळांच्या सुखद दंग्याला ऊत येईल.... तापलेला संतापलेला सूर्य याच्या गच्च भरलेल्या पानापानातून डोकावत, तुम्हाला हुडकून काढता काढता थकून पश्चिम घरात विश्रांती घ्यायला निघून जाईल...रात्रभराच्या विश्रांतीमुळे सूर्याचाही तुमच्यावरचा राग कमी होईल.... आणि नव्या सकाळी नव्या उत्साहाने तोही तुम्हाआम्हाला नवी ऊर्जा देईल....
अहो...ऐकलंत का....
अगं.... मी काय म्हणतोय...
बाबा....
आई....
चिमणाजी, चिमणाबाई, पप्पा, मम्मी, डार्लिंग... ताई, माई, अक्का, पप्या, पम्प्या झंप्या...
साहेब,सर, म्याडम, चिकुली,छकुली,छोट्या,गोट्या,बंटी, सोन्या,सोनुली....ओय ब्यूटी... अबे ओ हॅंडसम...
आता विचार कशाचा करताय ?
विचार करीत बसायची वेळ गेलीये..आता आचार-कृती करायची वेळ आली आहे... हे आपल्या प्रत्येकाचेच काम आहे...किमान एक तरी झाड़ लावायला हवे..... एक तरी झाड जगवायला हवे...
हा निरागस निसर्ग कोपायची आपण वाट पाहत बसायचे का?
पद्मनाभ हिंगे, पुणे.
२२ मे २०१७.

No comments:
Post a Comment